Friday, December 8, 2017

सोशल मीडिया - सगळ्यांच्या फायद्यासाठी


सोशल मीडिया म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायच म्हणजे समाजाच्या (लोकांच्या) हातातील एलेक्ट्रॉनिक माध्यम. तुम्ही हे माध्यम  पाहिजे तसे आणि हवं तस वापरु शकता, आणि वापरायला अगदी सोप्पं सुद्धा आहे, कारण आज सगळ्यांकडे smartphones आहेत. हा  smartphone आपले विचार आणि संदेश आपल्या नेटवर्क मधे लगेच आणि प्रभावीपणे पोचवू शकतो, मग ते ,छायाचित्र असो किवा एखादा वीडियो, जर का कन्टेन्ट चांगलं असेल तर तो वाइरल (viral) व्हायला वेळ लागत नाही. हो पण प्रेज़ेंटेशन आणि टाइमिंग, हे सगळ्यात महत्वाचे !



सोशल मीडिया प्रमोशन म्हणजे काय?

जर तुम्हाला सोशल मीडीया वापरुन आपला व आपल्या व्यवसायचा फायदा करून घ्यायचा असेल तर शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण सोशल मीडिया सारखे दुसरे प्रभावी आणि स्वस्त माध्यम आज उपलब्ध नाही.

एका वेळी बऱ्याच सोशल साईट्स वरती जेव्हा आपण  "कॅम्पेन " करतो आणि जेव्हा लोकं ती पोस्ट आपल्या नेटवर्क मध्ये शेयर करतात, आणि तेव्हा आपोआप आपल्या व्यवसायाचे प्रोमोशन होतं . हा सोशल मीडियाचा  सगळ्यात मोठा फायदा आहे जो कुठलाही अन्य मीडिया देऊ शकत नाही.

इथे तुमच्या पोस्टचे "शेल्फ लाईफ " सगळ्यात जास्त आहे, कारण ती पोस्ट तिथे कायमची राहणार आहे , जो पर्यंत ती  साईट अस्तित्वात आहे. म्हणजेच थोड्या "कॉस्ट" मध्ये जास्तीत जास्त लोकां पर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणूनच बऱ्याच NGO's आणि सरकारी संस्था आपलं बजेट सोशल मीडिया वर पूर्ण खर्च करतात.

हा सोशल मीडिया प्रोमोशनचा एक भाग झाला , त्यात आणखी बरेच पैलू आहेत ,  मेसेज पोस्ट करणे  ही  पहिली पायरी . आपण पुढच्या भागात सोशल मीडिया प्रोमोशनचे पुढील तपशील बघूया.



सोशल मीडियाच का?

तुम्ही काही उत्तरं अगदी प्रामाणिक पणे  द्या
  • तुम्ही दिवसातून किती वेळा Facebook चेक करता?
  • किती  वेळा whatsapp मध्ये उगाच मेसेज आला की बघता?
वरील उत्तरं दिलीत की तुम्हाला आपोआप सोशल मीडिया चं  महत्व कळेल. मी फक्त दोनच सोशल नेटवर्किंग साईट्सची नावं घेतली,  अजून बऱ्याच सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. कोणालाही इंट्रेस्ट नसताना तुम्ही उगाच आपल्या ट्रीप चा फोटो अपलोड करता, एयरपोर्ट चेकिन हमखास  करता. नंतर बघितले तर कळते की आपल्याला काहीच likes आले नाहीत कोणी कमेन्ट केली नाही. ज्या मित्रांचं किवा मैत्रिणीचं कमेन्ट यायला पाहिजे त्यांनी कमेन्ट केलच नाही. वेळ वाया गेला. ह्याचा अर्थ की तुम्ही कुठे तरी ती पोस्ट अपलोड करुन चुकलात. किंवा तो मेसेज बरोबर माणसांपर्यंत पोचला नाही.

हल्ली सगळ्यांच्या हातात स्मार्ट मोबाइल पोहोचला आहे, त्या बद्दल कुणाचे ही दुमत नसावे अगदी माझ्या मित्रांच्या आजोबांपासून ते छोट्या भाचवंडां पर्यंत सगळे फेसबुक वर दिसतात, तेव्हा आपण किंवा मोठ्या कंपन्या कशा मागे राहतील? त्या मुळे छोट्या व मोठ्या ब्रॅण्ड्सना त्यांचे ग्राहक टार्गेट करण्यास अगदी सोयीस्कर झालंय.

असं  कधी आपल्या बरोबर झाला आहे का ? की कधी तुम्ही कुठला तरी प्रॉडक्ट सर्च करताय आणि त्याच  प्रॉडक्ट ची ad तुम्हाला फेसबुक वर पण लगेच दिसायला लागली ? किंवा तुम्ही कुठल्या जुन्या मित्रांना भेटलात आणि फ्रेंड्स सजेशन मध्ये लगेच त्याचे नाव आले ?

सोशल मीडिया साईट्स  तुमची इत्यंभूत माहिती आपल्या  सर्वर मध्ये साठवून ठेवत असते. तुमची पूर्ण कुंडली त्यांच्या हातात असते, तुम्ही काय करता (Likes , Preferences , Groups ), कुठे जाता (location), तुमच्या आवडी निवडी काय आहेत, तुमच्या  फ्रेंड्स सर्कल मध्ये कोण आहे, इत्यादी . ही  सगळी माहिती सोशल मीडिया कंपन्या ब्रॅण्ड्सना विकतात. एक उदाहरण म्हणून google maps ची लिंक देत आहे ह्या वरून तुम्हाला अंदाज येईल की इंटरनेट कंपन्या तुम्हाला किती track करतात . आपल्या google id नी लॉगिन करा, लॉगिन केल्यावर तुम्हाला गूगलच सांगेल की तुम्ही  कुठल्या दिवशी कुठे कुठे गेला होतात.


म्हणूनच मोठे नावाजलेले brands आणि business सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात.

सोशल मीडिया प्रोमोशन - कसे काय ? (How to?)
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी माझ्या पुढील ब्लॉग पोस्ट मध्ये देणार आहे

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये "कॉस्ट टू लीड" फार कमी आहे, हे तर आत्ता पर्यंत तुम्ही जाणलेच असेल. तुम्ही ज्या जाहिराती साठी १०००० रुपये खर्च करीत होता, तीच जाहिरात जर अर्ध्या किमतीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही हे माध्यम का नाही वापरणार ? उदा . खालील चार्ट बघा

Parameter Newspaper Ad Banner/Poster  Television Internet Social Media 
Life of Ad/message 1 Day/week 1 -2 years 30 seconds 1 year  Permanent
Cost  25 k to 50 k  5k to 50 k  5 lakhs to 10 cr.  10 k to 50 k  Upto 10 k 
Reach  City/Region Local/Regional National Worldwide Worldwide


सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. तुम्ही एकदा पोस्ट केलेला मेसेज, फोटो नंतर एडिट करू शकता व तो कायमचा तिथे राहतो. Website असेल तर तुम्हाला त्याच domain दर वर्षी renew करायला लागतं . इथे तुम्हाला फेसबुकच आठवण करून देत की तुम्ही मागच्या वर्षी ह्याच दिवशी कुठली पोस्ट केली होती. तीच पोस्ट तुम्ही परत करू शकता ती पण अगदी फुकट !!

शिवाय तुमच्या जवळचे groups, events, हे सारखं सजेशन्स मध्ये येत राहतं . अजून सुद्धा बरेच  सोशल नेटवर्क आहेत ज्यांचे वेगळे फायदे आहेत. Eg YouTube, Pinterest इ. शिवाय अश्या ही साईट्स /ऍप्स  आहेत ज्यापासून आपण पैसेही कमवू शकतो, नाही खरं वाटत ? आपण बघूया पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये.

तेव्हा सोशल नेटवर्किंग मध्ये उगाच वेळ आणि बॅटरी वाया नको, त्याचा योग्य तो उपयोग करा आणि आपलं इंटरनेट नेटवर्किंग आपल्या व्यवसाय वृद्धी साठी सत्कारणी लावा.

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788
पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा



No comments: